दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा सोळावा दीक्षान्त समारोह आज
मेघे अभिमत विद्यापीठातील विविध ज्ञानशाखेत देशविदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ८१ विद्यार्थ्यांना १२० सुवर्ण, ६ रौप्य तर १२ कुलपती विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या दीक्षान्त समारोहाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदारकुलपती दत्ता मेघे राहणार असून मंचावर विशेष अतिथी डॉ.आरती सरीन, डॉ. प्रीती अदानी, डॉ. राजीव बोरले व डॉ. अभय दातारकर यांच्यासह प्रकुलपतीडा. वदप्रकाश मिश्रा, कलगरूडॉ. ललित वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, विद्यापीठाचेप्रधान सल्लागार सागर मेघे,व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ.मंदार साने, आरती कुलकर्णी,अनिल पारेख, कार्यकारी संचालकडॉ. अनुप मरार, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. तृप्ती वाघमारडॉ. जहीर काझी, कुलसचिव डॉ.श्वेता पिसूळकर, रवि मेघे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुनीता वाघ, डॉ. अलका रावेकर, ब्रजेश लोहिया, डॉ. पंकज अनावडे, सुकेशिनीलोटे, डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. उत्कर्षा पाचरणे, डॉ. रघुवीररघुमहंती, डॉ. पल्लवी डायगव्हाणे,डॉ. शुभदा गाडे, डॉ. पूजाकस्तूरकर, डॉ. अनिता वंजारी, डॉ. विद्या लोहे, डॉ. सुप्रिया नरड यांची प्रमुख उपस्थिती राहील. या समारोहाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या निमंत्रितांनी नियोजित वेळेपूर्वीच सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.