सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रुग्णांकरीता मोफत सीटी स्कॅन सेवा खाजगी रुग्णालयातील संदर्भित रुग्णांकरीता सवलतीचे दर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर या संस्थेशी राज्यस्तरावरुन करार होऊन सीटी स्कॅन सेवा सुरु करण्यात आलेली आहे. या सेंटरकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाक उपचारार्थ आलेल्या रुग्णांचा सीटी स्कॅन करावयाचा झाल्यास तो नि:शुल्क काढण्यात येतो. खाजगी रुग्णालय अथवा खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांकडून संदर्भित झालेल्या रुग्णांचा सीटी स्कॅन काढावयाचा झाल्यास त्यांच्याकडून सवलतीच्या दरात १ हजार ५०० रुपये आकारण्यात येते. दि. २५ एप्रिल २०२५ रोजी एक वृत्तवाहिनी मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीमध्ये हितेश कोठोडे वय ३५ वर्ष व श्री. रेहानंश कोठोडे वय १० वर्ष यांचा अपघात झाला असता ते नजिकच्या दवाखाना डॉ. साहू हॉस्पीटल येथे गेले होते. तेथे त्यांना उपचार दरम्यान सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला. सल्ला चिठ्ठी घऊन सदर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातात येथे येऊन अपघात विभागाची तिकीट काढून कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता सीटी स्कॅन सेंटरला येऊन त्यांनी डॉ. साहू यांची चिठ्ठी दाखविली असता त्यांनी नमुद सीटी स्कॅन दोन रुग्णांचे प्रती रुग्ण १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकुण ३ हजार रुपये शुल्क पडतील, अशी माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार रुग्णांनी शुल्काचा भरणा केला व संबंधित तंत्रज्ञाने रिपोर्ट व शुल्क आकारणीची पावती दुस-या दिवशी रिपोर्ट देतेवेळी दिल्या जाईल, अशी माहिती सुध्दा दिली व तशी पावती त्यांना देण्यात आलेली आहे. सदर रुग्ण नमुद सिटी स्कॅन कोणत्याही डॉक्टरांना न दाखविता निघून गेले. खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांडून संदर्भित झालेल्या रुग्णांस सीटी स्कॅन करीता सवलतीच्या दरातील शुल्क आकारल्या जातात, याची माहिती नसल्यामुळे त्यांनी परस्पर ई मीडिया व इतरांना कळविले व त्यांनी शहानिशा न करता बातमी प्रसिध्द केली, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.