जिल्हा नियोजन मधील कामे विभागांनी तत्काळ पुर्ण करावे- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा : गेल्या आर्थिक वर्षातीलसर्वसाधारण जिल्हा वार्षिकयोजना अंतर्गत जिल्ह्याकरीता ३१३ कोटीचा निधी करण्यात अर्थसंकल्पीत करण्यात आला होता. या निधीतून प्रत्यक्षात विविध विभागांकडून नियोजित करण्यात आलेली संपुर्ण कामे संबंधित विभागांनी तत्काळपुर्ण करुन कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासभागृहात २०२५-२६ याआर्थिक वर्षातील नियोजनाबाबतआढावा बैठकीचे आयोजनकरण्यात आले होते.

यावेळी त्यांनी या सूचना केल्या.बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथीसी. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी सुरज गोहाड, जिल्हानियोजन अधिकारी अनिरुद्धराजुरवार यांच्या सर्व विभागप्रमुखअधिकारी उपस्थित होते. विभागांनी २०२४-२५मध्य मागणी कलल्या निधीतीलकाही काम होऊ शकणारनसल्याने निधी परत केला.सन २०२५-२६ साठी कामांचे नियोजन करतांना ज्या कामांवरनिधी खर्च होऊ शकतो, अशीचनागरिकांच्या कल्याणाच्याकामाचा आराखड्यात समावशकरावा, असे निर्देश पालकमंत्रीश्री. भोयर यांनी दिले.

वन विभाग, तीर्थ क्षेत्राचा विकास, स्वच्छ भारतमिशन, बांधकाम, आरोग्य व जलसंधारणावर मोठ्या प्रमाणावरनिधी खर्च करण्यात आलाअसून या निधी मधून करण्यात आलेली कामे नागरिकांसमोरयेण्यासाठी कामाची जनजागृती करण्याच्याही सूचना पालकमंत्रीडॉ. पंकज भोयर यांनीयावेळी केल्या. नागरी सेवाव जनसुविधा अंतर्गत घेण्यात आलेल्या कामाचे लेखापरिक्षणकरुन कामांमध्ये पारदर्शकताआणावी. सन २०२५-२५साठीच्या कामाच्या नियोजनआराखडा सर्व संबंधितविभागांनी दि.१५ मे पुर्वी सादरकरण्याच्या सुचनाही यावेळीत्यांनी दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *