दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यातआला आहे. पहलगाम इथं क्रूर दहशतवाद्यांना धर्म विचारूननिष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला. या हल्ल्याने देशभर संताप व्यक्त केला जात असून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींर्च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला होता. तसंच या कुटुंबांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीबाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंहोतं. त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतमृत व्यक्तींर्च्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदतकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.