शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
सेवा हक्क कायदा सर्वसामान्यनागरिकांसाठी अतिशय उपयुक्तठरला आहे. सर्वसामान्य नागरिकांचेजीवनमान उंचावण्यासाठी व त्यांनासुखी समाधानाने जीवन जगता यावे,याकरीता विविध योजना राबविण्यातयेतात. या योजना संबंधितविभागांनी शेवटच्या घटकापर्यंतपोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले. अतिक्रमीत पांदनरस्त मक्तकरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याप्रयत्नाने विशेष मोहिम राबविण्यातयेत आहे. हा अतिशय चांगलाउपक्रम आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मागीलअवकाळी पावसाने जिल्ह्यात बऱ्याचशेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.प्रधानमंत्री पिकविमा योजनेतूनजिल्ह्यातील अशा नुकसानग्रस्त१ लाख ३० हजार शेतकऱ्यांना नुकसानीचा ११३ कोटींचा मोबदला वितरीत करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. नागरिकांना शासनाच्या विविधविभागाच्या याजना वळत उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालअस्तित्वात आली आहे. जिल्ह्यात सेवा हक्क कायद्यांतर्गत प्राप्त अर्जांवर तत्परतन कायवाही कली जात असून अर्ज निकाली काढण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. शासकीय फाईलींचा वेळ कमी करण्यासाठी कमीतकमी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे फाईल जातील, असे नियोजन करण्यात आल आह.
आनलाईन टपाल व्यवस्था, फाईलींचे मॅानेटरींग केले जात असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले. सेवा देणे म्हणजे केवळ प्रमाणपत्र देणे नसून सेवा पारदर्शक व गुणवत्तापुर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी कालमर्यादा ठेवून प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामे करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान म्हणाले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते सेवा हक्क कायद्यांतर्गत उत्तम सेवा देणारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, कामगार अधिकारी, ऊर्जा विभागाचे अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महा आयटीचे सेवादूत संचालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना जिवंत सातबारा, संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नादणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अतुल रासपायले यांनी केले, तर आभार अजय धर्माधिकारी यांनी मानले, कार्यक्रमाला सर्व सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.