शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माहिती व तंत्रज्ञान मंत्री ड आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव,ब्रँड अँबेसिडर पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी, माजी राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रीय,राज्य सेवा हक्क कोकणचे आयुक्त बलदेव सिंह, पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यासह प्रशासनातील ज्येष्ठ वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट लाकसवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाइन दिलेल्या आहेत. अजून ३०० सेवा या ऑनलाइन आणायच्या आहेत तर १२५ सेवा ऑनलाइन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांना १५ ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करा.१५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.जो शासनाचा विभाग १५ ऑगस्ट पर्यंत झाली नाही त्या विभागातील प्रत्येक सेवेकरिता दर दिवशी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल की,भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकार आपल्या संविधानात समाविष्ट केले हे मूलभूत अधिकार अधिकार सर्वांना मिळाले पाहिजेत. गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या गतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून या सेवा अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.मंत्रालयात चेहरा पडताळणी पमुळे देखील निम्मी गर्दी कमी झाली आहे. जीवनामध्ये इज ऑफ लिविंग आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाची सर्व सेवा व्हॉटसप वर तसेच सर्व माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी कमी हावन लाकाच जीवनमान सुसह्य होईल असेही ते म्हणाले.