हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठाकट रचला होता. परंतू, १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हशतवादाविरुद्धच्याआपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. जग आपल्यासोबत आहे.
मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळल. या हल्ल्यातील गन्हगाराना आणि कट रचणाऱ्याना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना गमावले आहे. विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यकमाला नवीन उचीवर नण्यात त्याच योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोला एक नवीन ओळख मिळाली. अंतराळ कार्यक्रमांमुळे भारताच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता मिळाली. आज भारत वापरत असलेले अनेक उपग्रह डॉ. कस्तुरीरंगन यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले, अशा शब्दांत मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली.