वर्धा शहर भाजपचे वस्ती चलो अभियान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भाजपाच्या गांव वस्ती संपर्क अभियान रविवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत प्रताप नगर येथे पार पडले. भाजपाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष निलेश किटे यांच्या नेतृत्वात शहरात अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा महामंत्री जयंत कावळे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नप उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, प्रशांत बुर्ले, माजी नगरसेवक प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते. सकाळी पालकमंत्री भोयर यांच्या उपस्थितीत प्रताप नगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर संजय गांधी निराधार योजना,दिव्यांग योजना, वयोश्री योजना व अन्य सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांची भेटी घेण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेंद्र वैद्य, प्रदीप ठाकरे, रमेश महल्ले, माधव कोटस्थाने, दीपक जोशी यांच्या निवासस्थानी पालकमंत्री यांनी भेटभ् दिल्या. तसेच श्रीनिवास कॉलोनी येथील शहरी वर्धिनी आरोग्य केंद्राला भेट देऊन डॉक्टर, कमचारी व नागरिकाशी सवाद साधला. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमास बुथ प्रमुख मंगेश मांगलेकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री उपस्थित राहिले.

यावेळी आर्वीचे आमदार सुमित वानखेडे देखील उपस्थित होते.कार्यक्रमानंतर पालकमंत्री भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख उपस्थित होते. संचालन माजी नगरसेविका श्रेया देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष निलेश किटे, मंगेश मांगलेकर,सौरभ देशमुख, प्रदीप ठाकरे, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, वर्धा सायकल क्लब,प्रताप नगर व राधा नगर परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी वर्धा सायकल क्लबच्या पदाधिका-यांनी स्वराज्य योद्धा सायकलींग स्पर्धा नुकतीच आयोजित केल्याची माहिती देऊन स्पर्धेत देशभरातून २५४ स्पर्धेक सहभागी झाल्याची माहिती दिली. स्पर्धेत वर्धेतील ३० जणांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. लवकरच स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होणार सल्याची माहिती दिली. या सोहळ्याला पालकमंत्री डॉ. भोयर यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती केली.याप्रसंगी सायकल स्पर्धेत सहभागी स्पर्धेकांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *