भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच “ब’ दर्जा- ना. बावनकुळे
डॉ. पर्बत यांनी आयुष्य महाराजांच्या सेवेत समर्पित केले आहे. त्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहे. येत्या ५ वर्षात मंदिराचा कायापालट होईल असा विश्वास ना. बावनकुळे यांनी दिला. महाराजांच्या समाधी दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची रीघ होती, काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता पासुन महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा देवाजी महाराजांनी १९५५ पासुन सुरु केली असुन आजही अखंड सुरू आहे. पुण्यतिथी सोहळ्यात, महाप्रसाद व दींडी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशी सह इतर जिल्ह्यातन १ लाख भाविकांनी उपस्थिती लावली. दिंडीसोहळ्याच्या मार्गात सडा रांगोळी काढून गावकरी येणार्या भाविकाच स्वागत करीत हात. शुक्रवारी रात्री महाराजांची पालखी समाधी स्थळापासुन नगर परिक्रमा करण्यासाठी दिंड्या, भगव्या पताकाव भोजाजी नामाच्या जयघोषात वारकरी सम्प्रदायाची पताकाफडकावित अकरा घोड्यांचाताफा व १५ बँड पथकच्याउपस्थितीत पालखीचे रिंर्गन व दिंडीस्पर्धा घेऊन सकाळी ८ वाजता समाधीस्थळी पोहोचल्यानंतर दही फोडण्यात आली. यशस्वीतेसाठी देवस्थानचे सचिव शिवदासपर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळ, नामदेव गाढव,रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, शालिनीताईईखार,श्रावण काचोळे, महेशकोसूरकर यांच्यासह गावाकर्यांनी परिश्रम घेतले.