बेटींगचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आयपीएल ट्रॉफी, क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेळणार्या बुकींर्वर कारवाई करून दोन मोपेडसह २ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने भिडी येथे केली. स्थानिक गुन्हे शाखेची चमू पुलगाव परिसरात अवैध व्यवसायवर कारवाइसाठी गस्तीवर हाती. दरम्यान, गोपनीय माहितीनुसार प्रफुल्ल पांडे (२५) रा. सिंदी (मेघे) हा त्याच्या सहकार्यासह भिडी येथील नवीन रेल्वे स्टेशन परिसरात शेतात वेगवेगळ्या मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांसोबत संपर्क करुन चैन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराईज हैद्राबाद या लाईव्ह क्रिकेट मॅचवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी छापा टाकला असता प्रफुल्ल पांडे, प्रफुल्ल सातपुते (३०) रा. गणेशनगर, नितीन शाहु (३३) रा. सोमनाथे ले-आउट वर्धा हे मिळून आले. त्याच्या ताब्यातून रोख २ हजार, एम.एच. ३२- ए.टी. ६७०८, एम.एच. ३२-ए.ई. १८३८ क्रमांकाच्या दुचाकी, जुगार खेळण्यासाठी वापरलेले पाच मोबाईल, असा २ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी मोठे जुगाराचे आकडे अजय उर्फ अज्ज्ाू तिवारी रा. वर्धा याच्याकडे दत असल्याच सागितल. या प्रकरणी देवळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि बालाजी लालपालवाले, पोलिस अमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भूषण निघोट, मनीष कांबळे, गोपाल बावणकर, अमोल नगराळे यांनी केली.