यांत्रिक बुद्धिमत्ता ही मानवी चेतनेला आव्हान- प्रो. कुमुद शर्मा
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धे चे पोलिस अधीक्षक अनुराग जैन, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथील विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगांवकर, जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे व चर्चासत्राचे संयोजक डॉ. राजेश लेहकपुरे मंचावर उपस्थित होते. कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा पुढे म्हणाल्या की यांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर माणूस, समाज, देश आणि मानवी कल्याणाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी केला पाहिजे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि विकसित भारताचे ध्येय केवळ तरुणांच्या प्रतिभेतूनच साध्य होईल. भारतातील तरुण प्रतिभेचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे संसाधने आहेत, दृष्टिकोनही असला पाहिजे. आपण शिक्षण, व्यवसाय, आरोग्य आणि जनसंपर्क यामध्ये यांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो असेही त्या म्हणाल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले की यांत्रिक बुद्धिमत्तेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण जागरूक आणि सतर्क राहून हे रोखले पाहिजे. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी मिडियाचे विद्यार्थी आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकांना समजावून सांगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाच्या कल्याणासाठी काय बरोबर आणि काय चूक आहे याबद्दल ए.आय. वर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे.
विशेष अधिकारी संजय इंगळे तिगांवकर म्हणाले की ए.आय.मध्ये मनानेच नव्हे तर हृदयाने देखील विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. जर निर्मात्यांनी असे केले तर आपले जग अधिक सुंदर होईल. या वेळी जनसंचार विभागातील शोधार्थी व विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेल्या “मीडिया समय’ चे प्रकाशन करण्यात आले. अतिथींचे स्वागत सूतमाळ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. स्वागत भाषण जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबेयांनी केले. जनसंचार विभागाचे एसोशिएटप्रोफेसर, संयोजक डॉ. राजेश लेहकपुरे यांनी चर्चासत्राचा अहवाल सादर केला आणिआभार मानले. चर्चासत्रात विदर्भातील जनसंपर्क अधिकारीआणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सहभाग घेवून आपले विचार मांडले आणि कामकाजाए.आय.चा वापर करण्यासाठी हे चर्चासत्रमहत्वाचे ठरले असे सांगितले.
यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उद्भवणाऱ्या समस्या आणित्यावरील उपायावरही गभीर चचा झालकार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवरझालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आणि दोन मिनिटेमौन पाळून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालनजनसंपर्क अधिकारी, चर्चासत्राचे सह-संयोजकबी. एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाचीसुरुवात विश्वविद्यालयाच्या कुलगीताने तरसांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी, अधिष्ठाता, विभागाअध्यक्ष, शिक्षक, शोधार्थी आणि विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.