दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार
सर्व पीडित कुटुंबियांच्या दुःखात सगळा दश त्यांच्यासोबत उभा आह. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा, भाऊ आणि जोडीदार गमावला. त्यातील प्रत्येक जण वेगवेगळे भाषिक होते. या सर्वांच्या मृत्यूवर आपल्या सर्वांचे दुःख, आक्रोश एकसारखा आहे. हा हल्ला फक्त पर्यटकांवरच झाला नाही तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतोय की, ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळणारच. आता उरलेल्या दहशतवाद्यानाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे.
१४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज बिहारच्या मातीतून मी संपूर्ण जगाला सांगतोय की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानता, असही पंतप्रधान मादी म्हणाले.