मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे “ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ आज मुख्यमंत्री दवद्र फडणवीस याच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कळ दाबून ब्रेक थ्रू कामाला सुरुवात केली.
यानंतर या कामाची पाहणी केली. हा भुयारी बोगदा मेट्रो ७ अ वर डाऊनलाईन वर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशन दरम्यान हा बोगदा असणार आहे. ही मेट्रो जोडणे मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचाटप्पा असणार आहे. या मेट्रोमार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई – विरारहा भाग छत्रपती शिवाजी महाराज आतरराष्टीय विमानतळासोबत मटानजोडले जातील. तसेच ठाणे वनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा मेट्रो ने जोडण्यात येईल. या मेट्रो मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे.