शहरातील बंद केलेल्या जमीनीच्या सातबाराचे प्रकरण नियमानुकल करुन तात्काळ मार्गी लावा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मौजा पिपरी मेघे येथील गजानन नगर येथील सर्वे नंबर ४७ मधील ६६ भुखंडाचा बंद केलेला सातबाराचे पुनर्जिवित करण्यासाठी तसेच नालवाडी येथील सानेगुरुजी नगरातील गुंठेवारी प्रकरणातील नझुल प्रकरण निकाली काढण्यासाठी तात्काळ बैठक घेऊन कार्यवाही करावी, अशा सुचना गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीत संबधीत विभागांना केल्या. गजानन नगर येथील नियमानुकल प्रकरण,सानेगुरुजी नगर येथील गुंठेवारी प्रकरण व नालवाडी येथील सातबारा उतारे उर्ववतकरण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोते यावेळी त्यांनी बैठकीत सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपजिल्हाधिकारी सामान्य, उप अधिक्षक भूमीअभिलेख, मुख्याधिकारी नगर परिषद, सह संचालक नगर रचनाकार, नायब तहसिलदार आदी उपस्थित होते.
गजानन येथील ६६ बंद असलेल्या भूखंडाचा सातबारा पुनर्जिवित करण्यासाठी तसेच सानेगुरुजी नगर सर्वे नंबर ५३ भुखंड क्रमांक १/१ चे गुंठेवारी प्रकरणात कमी झालेला नझुल शेरा बाबत जिल्हाधिकारी यांनी सबंधीत विभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना, मुख्याधिकारी नगर परिषद, उप अधिक्षक भुमी अभिलेख यांच्या समवेत बैठक घेऊन प्रकरण तात्काळ निकाली काढावे. तसेच मौजा नालवाडी येथील सर्वे न जुना ४/१, ४/३ नवीन ५२ मधील सातबारा उतारे पुर्ववत निर्गमित करण्याबाबत गांधीनगर, विकास विद्यालय व श्रीराम कॉलनी परिसरातील भुखंड धारक रहिवासी यांच्या प्राप्त निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचनाही यावेळी बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.