जगदंबा देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार, पोलिसात अफरातफर केल्याची तक्रार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम कारंजा (घा.) : तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रसिद्ध पुरातन श्री जगदंबा देवस्थान कमिटीअंतर्गत संस्थेचे मंगल कार्यालय असून ते भाड्याने देण्यात येते. या पोटी मिळालली रक्कम बकत जमा न करता कर्मचाऱ्याने परस्पर वापरली याबाबत त्याच्याकडून स्टॅमपेपरवर शपथपत्र घेत त्याने विशिष्ट कालावधीत पैसे परत करण्याचे नमुद करून दिले. मात्र कालावधी लोटूनही पैसे न दिल्यामुळे याबाबतची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली. रकमेची अफरातफर असताना कारंजा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. तक्रारी नुसार चेतन चरडे, रा. ठाणेगाव हा देवस्थान कमिटी अंतर्गत असलेल्या मंगल कार्यालय विविध कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचे काम बघत होता व मिळालेली रक्कम बँक ऑफ इंडिया शाखा ठाणेगाव या बँकेत जमा करत होता. १ जानेवारी २०२३ पासून त्याच्याकडे हिशोब होता.

जगदंबा देवस्थान कमिटी ठाणेगाव यांनी हिशोब तपासला असता ४ लाख ४६ हजार ६८५ रुपयांपैकी ७४ हजार ८०० रुपये फक्त बँकेत जमा केले होते. त्यामुळे ३ लाख ७१ हजार ८५८ रुपये मी लवकरच ३० जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत बकत जमा करता अस मद्राकावर नमद करून चतन चरड यानी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडे लिहून दिले. मात्र दिलेला कालावधी संपूणही चेतन चरडे यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे देवस्थान कमिटीचे किशोर राऊत, प्रताप घाडगे, दिलीप ठाकरे (सचिव), अमरसिंग घाडगे, रवींद्र जाधव, सतीश पांडे, नरेंद्र नासरे यांनी स्वाक्षरीनिशी कारंजा पोलिसात दि. १२ फेब्रुवारी२०२५ रोजी रकमेची अफरातफरकेली असल्याची तक्रार दिली.

मात्र दीड महिना लोटूनहीपोलिसांनी तक्रारीची दखल घेतलीनाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता हे प्रकरण धर्मदाययांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्यानेकारवाई रखडली असल्याचेकळले.याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद करून योग्य कारवाई करावीअशी मागणी तक्रार कत्यानी केली आहे. या गावातील व परिसरातीलहे पुरातन मंदिर असून प्रसिद्ध आहे.त्यामुळे मंदिर कमिटीने यात सामोपचाराने तोडगाकाढावा. व हे प्रकरण बंद करावे.यातून मंदिराची व गावाचीनाहक बदनामी होत आहे.अशी अपेक्षा ठाणेगाव येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्तकेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *