गावागावात हायमॅक्स लावण्याच्या नावाखाली होत आहे प्रचंड भ्रष्टाचार

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम वर्धा : नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कडून प्रत्येक गावागावात हायमॅक्स च्या माध्यमातून उजेड पाडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधीच्या या उजेड पाडण्याच्या धंद्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात लोकप्रतिनिधीची भ्रष्टाचाराची रोजगार हमी सुरू असून “अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ असा फामर्ूला ठरलेला आहे. या लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्यापैकीच ठेकेदाराला या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत असलेले दिसून येत आहे. बाजारात ज्या हायमॅक्स ची किंमत फक्त ६० हजार रुपये एवढी आह ताच हायमॅक्स गावामध्ये एक लाख ५८ हजार रुपये किंमतीला लावल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

या हायमॅक्समुळे ग्रामपंचायतच्या विजेच्या विदूतबिलात दीडपटीची वाढ झाली असून ग्रामपंचायतीला या हायमॅक्स मुळे बिल भरणे कठिन झाले आहे. बिल भरण्याची सुद्धा परिस्थिती नसल्याने गावातील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन विद्युत विभागाकडून कापण्याच्या मार्गावर आहे. यामुळे गावात अंधारच पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आहे. ग्राम विकासाच्या नावाखाली हा गोरख धंदा राजरोसपणे सुरू असून प्रत्येक प्रतिनिधीच्या विकास निधीतन गावागावात हायमक्स लावण्याचा उपक्रम मोठ्या हौसेने राबविण्यात येत आहे. या हायमॅक्स ची किंमत बाजारामध्ये फक्त साठ हजार रुपये असून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून याची किंमत एक लाख ६० हजार रुपये पर्यंत आकारण्यात येत आहे.

एका हायमक्स वर एक लाख रुपय जास्त आकारून हा एक लाख रुपया कुणाच्या घशात जात आहे, हे एक न समजणारे कोडे आहे,विषेश म्हणजे हे हायमॅक्स लावण्याबद्दल कोणत्याही ग्रामपंचायत कडून या लोकप्रतिनिधींना मागणी करण्यातच येत नाही. तरी हे लोकप्रतिनिधी स्वतःचे कार्यक्षेत्रात प्रत्येक गावात निदान दोन दोन हायमॅक्स लावत आहे. या हायमॅक्समळ ग्रामपंचायतचे बिल डबल येत असूनत्यांना आपल्या ग्रामपंचायतलामिळणाऱ्या पंधराव्या वित्तआयोगातून या विजेच्या बिलाचा भरणा करावा लागत आहे. एकदा हे लागलेले हायमॅक्सलाईट बंदपडल्यानंतर याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे सर्व ग्रामपंचायतच्या हद्दीतील हीलाईट बंद पडलेल्या स्थितीतआहे. बहुतेक ग्रामपंचायत मध्ये हे लाईट चालू असल्याचे दिसून येत नाही,या भ्रष्टाचाराची चौकशी करून हा गोरख धंदा थांबविण्यात यावा अशी मागणी जनतेतून केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *