ग्रामपंचायत प्रशासकांकडून निधीची उधळपट्टी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या तीनवर्षांपासून प्रशासक असल्याने एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, अशीच अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींवरही प्रशासक असल्याने या ग्रामपंचायतींनीही कंत्राटदाराच्या मर्जीने कामे करून १५वित्त आयोगाच्या निधीची उधळपट्टी केली आहे. प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींचा सर्वाधिक निधी साहित्य खरेदीवरखर्च झाला असून यात ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ अशीच भूमिका राहिल्याने आता चर्चा व्हायला लागली आहे. ग्रामपंचायतींना विकास कामांकरिता जनसुविधा, नागरीसुविधा, जिल्हा नियोजन समिती तसेच १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध होतो. १५ व्या वित्त आयोगाचानिधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या निधीची प्रशासक काळात उधळपट्टीच चालविल्याचे शासनाच्या ऑनलाइन प्रणालीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ५१९ग्रामपंचयतींपैकी तब्बल ५०७ ग्रामपंचायती ‘पीएफएमएस’ प्रणालीशी संलग्न असल्यान कोणत्या गामपंचायतीन १५ व्यवित्त आयोगाच्या निधीतून कोणती कामे केली, त्यासाठी किती निधी खर्च केला हे एका क्लिकवर उपलब्ध होते. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वस्तू खरेदीवर जोर दिला असून लाखो रुपयांची देयके काढल्याचा धक्कादायकप्रकार पुढे आला आहे. त्यामुळे हा निधी पाण्यात जाणारा असल्याने गावकऱ्यांनी याकडे लक्ष देत हिशेब मागण्याची वेळ आली आहे.