शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी- खा. अमर काळे
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकाला अतगत कषि विज्ञानकेंद्र सेलसुरा येथे करण्यातआले हात. तसच जिल्ह्यातीललाभाथ्याना पी.एम. किंसान सन्माननिधीच्या १९ व्या हप्त्याचे वितरणकार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला आ. राजेश बकाने, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जीवनकतोरे, डॉ. रुपेश झाडोदे, डॉ.निलेश वझिरे, डॉ. सचिन मुळे, डॉ. सविता पवार, मंडळ कृषि अधिकारी सुभाष मुडे, तालुका कृषि अधिकारी निलेश उगवेकर, निकेश इंगोले, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री जांगळेकर,बायफ चे संजय बाभूळकर आदी उपस्थित होते. कृषि विज्ञान केंद्रानी शेतकयांना मार्गदर्शन करुन शेती पुरक उद्योग विकासासाठी प्रेरीत करावे. असेही खा. अमर काळे पुढेबोलताना म्हणाले. शेतकऱ्यांनी कृषि विज्ञानकेंद्रातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने शास्त्रीय पद्धतीने शेती करावीतसच मल्यवधन प्रकिया करूनबाजारपेठ संधीचा लाभ घ्यावाव उत्पन्न वाढवावे.
कृषी विज्ञान केंद्राने बिजोत्पादन वाढून ते बियाणेजिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच हाय-टेक नर्सरीउभारावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतावर उत्तम दर्जाची रोपे जातील.यासाठी लक्ष केंद्रीत करावे. बचत गटांचे उत्पादन विक्रीसाठी एकभवन देवळी येथे उभे करण्यातयेईल असे राजेश बकाने म्हणाले डॉ जीवन कतोरे यांनी पीएम किसान सम्मान निधी योजने विषयी विस्तृत माहिती तसेच कृषिविज्ञान कद्रामार्फत राबविण्यात यतअसलेल्या विविध प्रकल्प याविषयीमाहिती दिली. तांत्रिक सत्रा दरम्यान डॉ रुपेशझाडोदे यांनी उन्हाळी पीक लागवडविषयी तर डॉ निलेश वझीरे यांनी उन्हाळी पिकातील कीड व रोग नियंत्रण व डॉ सचिन मुळे यांनी दुग्धव्यवसाय व जनावरांची काळजीतसेच डॉ सविता पवार यांनी ड्रोन फवारणी तंत्रज्ञान व बीबीएफतंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांनामार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी पी एम किसानसम्मान निधीच्या लाभार्थ्या सत्कारमान्यवरांच्या शुभहस्ते करण्यातआला. तसेच राष्ट्रीय कृषि विकासयोजना अंतर्गत २६ दिवसीय मशरूमउत्पादन प्रशिक्षण उत्तम रित्या पूर्ण करणाऱ्या विनोद दांदळे, प्रवीण येनूरकर, इरफान अली, विजय सिडाम, वैशाली दिघीकर, नीलिमाअक्कलवार या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्रदऊन सन्मान करण्यात आला तसेच कृषि विज्ञान केंद्र येथे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तालुकाकृषि अधिकारी, देवळी, वर्धा,महाबीज, प्रगतिशील शेतकरी यांचीदलाने उभारण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ प्रेरणा धुमाळ, गजानन म्हसाळ, वैशाली सावके, समीर डेकाटे,किशोर सोळंके, प्रतीक्षा पिंपळे, समीर शेख, दिनेश चराटे, माधुरी डफाडे, वसीम खान, गजेंद्र मानकर,प्रबोध पाटे, सुमित म्हसाळ, वैभवचौधरी, ऋतुजा कोरडे व सर्व चमू यांनी योगदान दिले.