दिशा समितीची सभा ५ मार्चला

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) सभा ०५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार अमर काळे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत खालील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या २२ जुलै २०२३ च्या कार्यवृत्ताला मंजुरी प्रदान करणे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रगतीचा आढावा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (सर्वासाठी घरे- शहरी), भुमि अभिलेख्याचे आधुनिकरण कार्यक्रमाचा आढाव, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना,

प्रधानमंत्री कृषी सिंचनयोजना, प्रधानमंत्री उज्वलायोजना, प्रधानमंत्री पिक विमायोजना, प्रधानमंत्री कौशल्य विकासयोजना, पायाभूत सुविधा संबधीत कार्यक्रम टेलीकॉम, रेल्वे, हाईवे, महाराष्ट राज्य गामीण जीवन्नातीअभियान प्रगतीचा आढावा, दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण, एनएचएम अंतर्गत कामाचाआढावा. शालेय पोषण आहार, डिजीटल योजना – ग्राम पंचायत कॉमन सव्हिस सेंटर, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना,एकात्मिक शक्ती विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना,परंपरागत कृषी विकास योजना मृदाआरोग्य पत्रिका, प्रधानमंत्री आदर्शग्राम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुगम्य भारतअभियान, बेटी बचाव बेटी पढाव,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंमलबजावणी वअध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारेविषय. बैठकीत घेण्यात येणार आहे.जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीच्या वतीने कळविण्यातआले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *