मराठी लोकगीतांच्या “माय मराठी’ कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने सुप्रसिध्द गायक मयूर पटाईत, सानिका व प्रांजली यांची सुरेल प्रस्तुती
या वेळी वर्धेचे सुप्रसिध्द गायक मयूर पटाईत यांनी मोरया, पोवाडा, एकच राजा, शुर आम्ही सरदार आम्हाला, कोळी गीत सादर करत रसिकांची मने जिंकली. संपूर्ण भारतात उत्कृष्ट अकरा मध्ये नामांकित झालेली सुप्रसिध्द गायिका सानिका बोभाटे हिने आदिमाया अंबाबाई, मी ढोलकर ,उगवली शुक्राची चांदणी गाणे गात उपस्थितांची मने जिंकली .तसेच प्रांजली गायकवाड हिने अनेक लोकगीत सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. बालकलाकार अर्श चावरे, विवेक नरांजे व नीलिमा फासग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी सादर केले.
या कार्यक्रमाला नितीन सोनोने जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सुधीर गवळी प्रकाशक, मिलिंद जूनगडे, प्रा.अरुण हार्षबोधी तसेच वर्धा कला महोत्सव, लायन्स क्लब गांधी सिटी, कलास्पर्ष फाउंडेशन, शिक्षणं विभाग माध्यमिक वर्धा, विदर्भ साहित्य संघ, लोक महाविद्यालय वर्धा, प्रगती संगीत विद्यालय, सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.