वर्धा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराचा “भोंगळ’ कारभार चव्हाट्यावर…

वर्धा/प्रतिनिधी वर्धा तहसील अंतर्गत एका नायब तहसीलदाराचे वृत्त मालिका सुरू असतांनाच आपण केलेल्या “कृष्णकृत्या’वर पांघरून घालण्याकरिता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत सदर वादग्रस्त फेरफारचा आदेश पारित केल्याचे बतावणी करीत आहे. या संदर्भात आम्ही शोध घेतला असता असा कुठलाही प्रकारचा न्यायालयाचा आदेश झाला नसल्याचे दिसून येत आहे. फेरफार करतेवेळी न्यायालयाच्या आदेशाचे प्रकरण क्रमांक नमूद का केले गेले नाही? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून केवळ “लक्ष्मीदर्शना’तून खोटा आदेश लपविण्याकरिता ही बतावणी सुरू तर नाही ना? अशी शंका निर्माण होते. मौजा सिरसगाव (ध) शेत सर्वे क्रमांक १२२/२ या शेतजमिनीवर बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असताना बँकेच्या व्यवस्थापकांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सदर फेरफार हा निकाली काढण्यात आला असून याबाबत वृत्त प्रकाशित होताच या नायब तहसीलदाराच्या पायाखालची वाळू सरकत चालल्यामुळे न्यायालयाचे आदेशाची बतावणी करून सदर वादग्रस्त फेरफार निकाली काढल्याची बतावणी केली जात आहे.

प्राप्त कागदपत्रानुसार अशा प्रकारचे वादग्रस्त फेरफार घेऊ नये असा निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुद्धा असे फेरफार कशाच्या भरोशावर होतात? हे कळायला मार्गच उरला नाही. महसूल कार्यालय अशाच तुगलकी कारभारामुळे बदनाम होत असून याकडे वरिष्ठांचे डोळे झाक तर सुरू नाही ना? अशी चर्चा जोरदार रंग धरू लागली आहे. नुकत्याच प्राप्त कागदपत्रानुसार एका प्रकरणात तलाठीयांच्याकडून कुठलाही अहवाल न घेता तसच महसल विभागात प्रकरण दाखल नकरता आदेश पारित केल्याचे दिसून येतआहे. याबाबत सविस्तर वृत्त “जनसंग्राम’लवकरच प्रकाशित करणारच. अशाया निगरगट्ट व कर्तव्यहीन तसेचमहसूल नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाईकरतील का?याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.साहेब…खोटे बोलताना निदानआपण केलेल्या चुकांची परिमार्जनकरताना जिभेला हाड आहे की नाही?याबाबत खमंग चर्चा महसूल विभागात होताना दिसत आहे. (क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *