कोलगाव शिवारात तुरीच्या गंजीला आग

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : कोलगाव शिवारात अनिल काळबांडे यांच्या तीन एकर शेतातील तुरीची कापणी करून एका ठिकाणी गोळा करण्यात आल्या होत्या. मात्र, मळणीयोग्य असलेल्या तुरीच्या गंजीला बुधवार ११ रोजी रात्री अचानक आग लावल्याने पूर्ण गंजी जळन खाक झाली. यामळ शतकरी काळबांडे यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, शेतकरी काळबांडे यांनी सेलू पोलिसात तक्रार देऊन तीन व्यतींची नावे संशयित म्हणून तक्रारीत नमूद केली आहे. यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातून गेला. आता शेतकर्यांची भिस्त रबीवर होती. मात्र, कापूस, तूर यासह अन्य पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट आली. अशाही परिस्थितीत शेतकर्यांनी स्वत:ला सावरून पिकांची काळजी घेतली. सध्या जिल्ह्यात तूर कापणी सुरू आहे. कोलगाव येथील शेतकरी अनिल काळबंडे यांनी तीन एकरात तुरीचे पीक घेतले. तूर कापणी करून शेतातच गंजी लावली. मात्र, बुधवारी या गंजीला अचानक आग लागली आणि पाहता पाहता अंदाजे ३० विंटल तूर जळून खाक झाली. या आगीत बैलबंडीचेही नुकसान झाले. घटनेची तक्रार सेलू पोलिसात करण्यात आली असून संशयित म्हणून तीन व्यक्तींची नावे तक्रारीत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *