राष्ट्रीय लोक अदालतीत १६०१ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार ६०१ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य ५ कोटी २३ लक्ष ७ हजार ७५५ इतके आहे. न्यायालयामध्ये प्रलंबीत असलेले प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदलतीचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय लाक अदालतमध्य दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीन प्रकरणामध्य तडजाड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.

राष्टीय लाक अदालतमध्य प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली, जिल्हा न्यायाधीश-५ जे. ए. पडगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत प्रकरणे तडजोडीस पात्र असलेली प्रकरणे निकाली काढण्यास मोठे यश प्राप्त झालेले असल्याचे मत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली यांनी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचारान लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १ हजार २७२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम ३ कोटी ४६ लाख १५ हजार १०५ रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पव प्रकरणापैकी ३२९ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधील तडजोडीचे मुल्य १ कोटी ७६ लाख ९२ हजार ६५० इतके होते. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण १ हजार ६०१ इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ५ कोटी २३ लाख ७ हजार ७५५ इतके आहे.