सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाचीबैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यातआली. तसेच यावेळी काही महत्वाचेनिर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान,सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतघेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की,आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयासह लोहगावविमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराममहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे,अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.