शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल – माजी खासदार रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,देवळी : देवळी: देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संस्था छोटी असून सुद्धा प्रगतीपथावर आहे, आज शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन होत आहे, कॉम्प्लेक्समुळे देवळी परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना आधुनिक व्यावसायिक सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून रोजगार निर्मिती आणि व्यापारवृद्धीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच गावाच्या आर्थिक विकासस गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला.. देवळी येथे देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था र.नं.४२६ अंतर्गत शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमीपूजन सोहळ्याची माजी खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरद आदमने, माजी उपाध्यक्ष शाम घोडे, न.प.सभापती विजय गोमासे, न.प.सभापती शुभांगी कुर्जेकर, न.प.गटनेता उमेश कामडी, न.प.नगरसेविका विश्वजीता पोटदुखे, न.प.स्विकृत सदस्य रवी कारोटकर, श्रावण साखरकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद आदमने यांनी, संचालन संस्थेचे सचिव सतीश टेम्भेकर यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार सदस्य श्रीकांत येनूरकर यांनी केले. कार्यक्रमाला संचालक संतोष मरघाडे, प्रकाश कारोटकर, प्रकाश देशमुख, सुनील पिपरे, नितीन बकाने, शंकर बंडे, वसंत तरास, संजय पारिसे, सौ. राधा उगेमुगे, किसना उगेमुगे, गणपत पिपरापुरे, रमेश सातपुते तसेच संस्थेचे सभासद व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *