कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज… काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

वर्धा/प्रतिनिधी “पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील वर्धा येथे आयाजित कायक्रमात पतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. ही योजना गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी कारागिरांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी १८ प्रकारच्या व्यवसायातील १८ लाभाथ्याना टूलकिटचे वितरण करण्यात आले. तसेच, कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार गरजूंना ३ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही हमी देण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत काही नियम तयार करण्यात आले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही १८ प्रकारच्या व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तर पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र-अपात्र आहेत, तसेच यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय? याबद्दल जाणून घ्या…

अशा प्रकारे कर्जाची रक्कम जाहीर केली जाते

कोणतीही कुशल व्यक्ती पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. त्याला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांमध्ये मदत मिळण्यासाठी तो ाजनअतगत कजासाठी अज करू शकतो. यामध्ये मोदी सरकारने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे, जी दोन टप्प्यांत दिली जाते. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्याटप्प्यात १ लाख रुपयांचे कर्जदिले जाते, तर व्यवसाय सुरूकेल्यानंतर, विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात लाभार्थीला २ लाखरुपयांचे कर्ज दिले जाते. यासाठी जिथे अर्जदाराला कोणतीही हमी द्यावी लागणार नाही, तिथ अत्यत सवलतीच्या ५ टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाईल.