गुंजखेड्यात जगातील सर्वात लहान व वेगवान पाण्यावरील पोट्रेट रांगोळी

पुलगाव/प्रतिनिधी नजिकच्या गुंजखेडा येथील रहिवासी पुनम दीपक तरोणे (केणे) यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पाण्यावरील पोट्रेट रांगोळी साकारली. सर्व पडताळणी करून एशिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंदणी केली. पुनम यांनी या रांगोळीसाठी कोणतीही स्केच न करता कुठल्याही टूलचा वापर न करता अवघ्या ७.५ सेंटीमीटर मध्ये सर्वात कमी वेळेत ११ मिनिट ३२ सेकंद ९८ मिली सेकंद मध्ये पाण्यावर पोट्रेट रांगोळी साकारून सर्वात व ेगवान पाण्यावरील कलाकृती म्हणून आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमात नोंद करून घेतली.

पुनम दीपक तरोणे (केणे) यांनी वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक, आंतरराष्ट्रीय युथ स्किल अवॉर्ड व आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार (स्पेन) या सर्व रेकॉर्डमध्ये नोंद केल्यावरही ही कलाकार थांबली नाही, नुकतीच संसारिक जीवनात प्रवेश करूनही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पोटर््रेट रांगोळी पाण्यावर साकारून आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आता तिचे पुढील ध्येय गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड हे असून तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

पुनम यांनी या आधी ८ मिनिटांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पेंटिंग साकारून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. आता पुनम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद करून आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांच्या या कला क्षेत्रामध्ये पुनम यांचे पती दीपक तरोणे यांचे मोलाचे सहकार्य आहे.