पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना आळख प्राप्त करून दण्यासाठी तसच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा येथे २० सप्टेंबर २०२४ रोजी होत असून यासाठी भव्यदिव्य थीम पॅव्हेलियन उभारण्यात आले आहे. वैशिष्ट म्हणजे पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन येथे साकारण्यात येत आहे.

वर्षपुर्ती सोहळ्यानिमित्त पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथा दर्शविण्यासाठी स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर भव्यदिव्य थीम पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. यात देशभरातील १८ कारागिरांच्या आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही प्रदर्शनी आंतरराष्ट्रीय दर्जाची असून मुख्य समारंभानंतर २१ आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी वर्धा जिल्ह्यातील तसेच विदर्भातील नागरिकांसाठी सदर प्रदर्शनी खुली राहणार आहे.