मेघे अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव यवतमाळची भाग्यश्री खानोदे स्वरवैदर्भीची विजेता

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात आयोजित ‘स्वरवैदर्भी’ विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेचे विजेतेपदाचा सन्मान यवतमाळ येथील भाग्यश्री खानोदे या १६ वर्षीय युवा गायिकेने पटकाविला. दत्ता मघ सभागहात रगलल्या या महाअतिम स्पध त हिंगणघाटचा सम्यक मून आणि वाशीम येथील यश देहदडे हे उपविजेते ठरले. या महास्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. पंकज भोयर व विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. वैभव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी, अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, शालिनीताई मेघे, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार वितरण कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक डॉ. आशिष अंजनकर, भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापक सुरेश रहाटे, संगीता इंगळे, परीक्षकवृंद संगीतज्ञ वैभव गावंडे (दर्यापूर), गायिका अनघा पांडे रानडे, तबलावादक आकाश चांदूरकर, दिलीप मेने, स्वरवैदर्भीचे सहसंयोजक अभय जारोंडे, सुनील रहाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

विदर्भातील नव्या दमाच्या १३ गायकगायिकांमध्ये रंगलेल्या या महास्पर्धे त मेरी पसद, साहिर लुधियानवी याची चित्रपटगीते आणि महाराष्ट्र गौरव या तीन फेऱ्यात गाणी सादर करण्यात आली. तिन्ही फेऱ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेली या स्पर्धेतील सर्वात लहान गायिका भाग्यश्री पूर्णाजी खानोदे हिला २२ हजार रुपयांचा रोख पुरस्कार आणि स्वरवैदर्भी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय १५ हजार रुपयांचा पुरस्कार सम्यक मून (हिंगणघाट) याला तर तृतीय ११ हजार रुपयांचा पुरस्कार यश देहदडे (वाशीम) याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह प्रदान करण्यात आला. यासोबतच, तनीश गजभिये, तेजस्विनखोडतकर, प्रतीक म्हैसकर, लाजरी भुरे, शुभम विरुटकार (नागपूर), अनुराग गुजर, अंकित कैथवास (यवतमाळ), सानिकाबोभाटे (वर्धा), प्रदीप रुईकर (आर्वी),

प्रज्योत म्हैसकर (हिंगणघाट) हे प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी ठरले. गायकांना चारू साळवे (कीबोर्ड), पिंटू काळे (संवादिनी), शीतल मांडवगडे (तबला), कुलदीप चवरे (ढालक), राजश ढाकर (आक्टापड), दिनशकांबळे (गिटार) यांची संगीतसाथ लाभलीसंपूर्ण स्पर्धेचे संचालन प्रसिद्ध निवेदिकाज्योती भगत यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी गायक वैभव गावंडे, दिलीप मेने, डॉ. ललितभूषण वाघमारे, संगीताइंगळे, ज्योती भगत यांनी हिंदी सिनेगीते सादर केली. स्वरवैदर्भीच्या आयोजनात सहायकप्रशासकीय अधिकारी सुशांत वानखेडे,क्रीडा अधिकारी अफसर पठाण, प्रवीण मेघे,अभिजित राऊत, हेमंत पुंडकर, स्वप्निल चरभे, पंकज अडेकर, निलेश ठाकरे, भूषण भोयर, किरण आंबटकर, मंजर अब्बास, अमोल बरडे, अमोल बिटे, हितेश मुरकुटे, मयुर ठाकरे, गणेश काळे, रवी ढोबळे आदींचेसहकाय लाभल. कायक्रमाला रसिकाचमोठ्या संख्येने उपस्थिती होती.