जय श्रीरामच्या निनादात निघाली स्कूटर रॅली

वर्धा/प्रतिनिधी श्रीराम मंदिर गोल बाजार व श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्याने आयोजित पाडवा पहाट व मराठी नववर्षाच्या स्वागताचे आवाहन करण्यासाठी २१ रोजी नवसंवत्सराच्या पूर्वसंध्येला भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली. या रॅलीत नववारी परिधान करून भगवे फेटेधारी युवती व महिलांची उपस्थिती लक्षनिय होती. गेल्या १६ वर्षांपासून श्रीराम मंदिर व शोभायात्रा समितीच्या वतीने पाडवा पहाट या संगीत म ैफलीच े आया ेजन करण्यात येते. या कार्यक्रमाची माहिती व नववर्षाचे स्वागत करण्याच्या आवाहनासाठी पूर्वसंध्येला स्कूटर लीचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानाहून रॅलीला प्रारंभ झाला. सोशॉलिस्ट चौक, बजाज चौक, शास्त्री चौक, पँथर चौक, रामनगर, प्रतापनगर, आर्वी नाका, बॅचलर रोड, धुनिवाले चौकमार्गे जय जय श्रीरामचा जय घोष करीत केसरीमल कन्या शाळेपुढे अरुण काशीकर यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप झाला. शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, रांगोळ्या काढून रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीत शहरातील चारही दिशेने जत्थ्याने महिला, पुरुष, युवक, युवती सहभागी होत होते.