नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यातआलेली नाही. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असा उल्लेख निवडणूकआयोगानं केला. मात्र, याबाबत अद्यापनिवडणूक आयोगानं कोणतीही ठोस घोषणाकेलेली नाही.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंनी निवडणुका नोव्हेंबर महिन्यातहोणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं गेल्यामहिन्यात घेतलल्या पत्रकार परिषदतजम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.त्यानुसार, १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये तीनटप्प्यांमध्ये निवडणुका आणि त्यांचे निकाल लागणार आहेत. त्याचवेळी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात राज्यभरातील मतदारसंघामध्येमतदान होऊन त्यांचेही निकाल जम्मूकाश्मीरबरोबरच लावले जातील. आधी १ आक्टोबर रोजी हरियाणात मतदानाची तारीखजाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात बदल करून ती ५ ऑक्टोबर करण्यात आली आहे.