जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक

वर्धा/प्रतिनिधी विविध कारणानी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य, थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ४९ ग्रामपंचायतींमध्ये ६७ सदस्यांकरिता तसेच ८ ग्रापंमधील थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होईल. त्यामुळे गावांमध्ये पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. विविध ग्रामपंचायतींमध्य े निधन, राजीनामा, अनर्हता आदी कारणांमुळे सरपंच, सदस्यांची पदे रिक्त होतात. विविध कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने पोटनिवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. निवडणुका असलेल्या मध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल होईलपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात ४९ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये ६७ सदस्यपंदासाठी तर आठ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे.
वर्धा तालुक्यातील कुटकी, मांडवगड, केळापूर, आंजी मोठी, झाडगाव, आर्वी तालुक्यातील पानवाडी, पिंपळगाव भोसले, आजनगाव, निजामपूर, तरोडा, परसोडी, सेलू तालुक्यातील तळोदी, खडका, जयपूर, आलगाव, दिंदोडा, आमगाव ख, चिंचाळा, मलकापूर, टाकळी द, तळणी भा., सोनोरा ढोक, आष्टी तालुक्यातील खडका, परसोडा, हिंगणघाट तालुक्यातील कात्री, हिवरा, वेळा, पारडी, कारंजा घाडगे तालुक्यातील जऊरवाडा, चेापण, कुंडी, लादगड, समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर, सुजातपूर, गिरड, फरीदपूर, मांडगाव, कारडा, झुनका, शेडगाव येथे सदस्यपदासाठी तर आर्वीतालुक्यातील काचनूर, देवळी तालुक्यातील लकापूर, विजयगोपाल, आष्टी तालुक्यातील माणिकनगर, हिंगणघाट तालुक्यातील कात्री, वेळा, गाडेगाव, कानगाव येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
१८ एप्रिल रोजी तहसीलदारांनीनिवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, २५ एप्रिल ते २ मेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, ३ मे रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी, ८ मे रोजी नामनिर्देशनपत्र मागेघेण्याचा शेवटचा दिवस, ८ मे रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणिउमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी५.३० वाजतापर्यंत मतदान तर १९ रोजी मतदान होईल.