पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेत

वर्धा/प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील किट वाटप कार्यक्रम वर्धेत होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वर्धेत दोन वेळा येऊन गेले आहेत. त्यावेळी ज्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावर सभा झाली होती त्या शाळच्या मैदानावर मोदी यांच्या हस्त विश्वकमा योजनेत सहभागी झालेल्यांना किट वाटप करण्यात यणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानाची काल पाहणी करण्यात आली. मोदी १९ सप्टेंबरला वर्धे त येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या दौऱ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही दुजोरा दिला.