आंतरराष्ट्रीय योग दिवस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योगा अत्यंत फायदेशीर- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी जगाच्या कोपऱ्यात तुम्ही कुठेही जा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे तणाव तुमच्यापासून लपलेला नाही. झोपेचा अभाव, अपुरा आहार आणि जीवनातील ताणतणाव या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी केवळ आहारच नाही तर शारीरिक कसरती खील होणे गरजेचं आहे. यासाठी दैनंदिन जीवनात योगासने, प्राणायम करण्यासाठी वेळ काढण आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योगा अत्यंत फायदेशीर असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आंतराष्ट्रीय योग दिवस निमीत्त केले. संयुक्त राष्ट्रांद्वारे संपूर्ण जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे.

भारताच्या विनंतीवरुन योग दिनाला प्रारंभ झाला. २१ जून हा दिवस जगातल्या अनेक भागात सर्वात मोठा दिवस असतो आणि एक प्रकारे सूर्याशी जवळीक साधणारा हा दिवस असतो. या गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जून ही तारीख निश्चित करण्यात आली. दिनांक २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य देशासह जिल्ह्यातही आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व्दारा मोदी०९ महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत लोकसभा, विधानसभा, मंडल व बुथ स्तरावर योग शिबीराचे आयोजन तसेच विविध सेवाभावी संस्थां तर्फे योगासन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. निरोगी आरोग्याकरिता योगासन अतिशय महत्वाचे असून वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाभावी संस्था, शाळा व महाविद्यालयातील विध्यार्थी, कार्यकर्ते, नागरिकांनी त्या-त्या क्षेत्रात आयोजित योग, प्राणायाम शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.