सावंगीच्या नर्सिंग महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर व्याख्यान विवेकानंदांच्या विचारांची आज गरज आहे- पुजारी

वर्धा/प्रतिनिधी युवकांनी आपल्या जीवनात सकारात्मकता जोपासण्यासाठी आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे महाराष्ट्र कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी, सोलापूर यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शालिनीताई मेघे नर्सिंग महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात काढले. परिचारिका महाविद्यालयाच्या सभागृहात आयाजित व्यसनमुक्तीवरील व्याख्यानात पुजारी यांनी जीवनातील उद्दिष्ट्ये सध्या करण्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन केले.

यावेळी विवेकानंद केंद्राचे युवा नेतृत्व प्रमुख मनोहर बारस्कर, व्यक्तिमत्व विकास प्रमुख सुभाष खुरपडे, शालिनीताई मेघे बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना शर्मा, कॉलेज ऑफ जीएनएम नर्सिंगच्या प्राचार्य अख्तरीबानो सैय्यद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन करिष्मादोड हिने केले तर आभारउपप्राचार्य मीनाक्षी चौधरी यांनीमानले. या आयोजनात प्रतिभा वानखेडे, सीमा येळणे, शबनम सैय्यद, मनीषा वाघ, सागरभोवरे, धनश्री सेलूकर, सार्थक मेघे, माधुरी खडतकर, अभिलाषसाटोणे, प्रशासकीय अधिकारी प्रणिता पोहणेकर यांचे सहकार्य लाभले. या व्याख्यानाला शिक्षकआणि विद्याथ्याची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.