मुलींच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांचा तसेच निवासीविद्यार्थ्यांच्या दृष्टीने गंभीरस्वरुपाच्या काही अनुचीत घटना राज्यात इतरत्र घडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थीनीच्या सुरक्षेचाप्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशाप्रकारच्या अनुचीत घटना घडुनये याची दक्षता घेऊन मुलींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी राहल कडिलयांनी वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमतीपाटील यांना दिल्या. महादेवपुरा येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीयमुलींचे वसतीगृहाला जिल्हाधिकारीराहुल कर्डिले यांनी अचानक भेट देऊन मुलींच्या वसतीगृहाच्याइमारत व आजबाजच्या परिसराचीपाहणी करुन मलींच्या सरक्षबाबतआढावा घेतला यावेळी त्यांच्या सोबत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी उपस्थितहोते. राहुल कर्डिले यांनी यांनीवसतीगृहातील विद्यार्थ्यांशीसंवाद साधुन त्यांना उद्भभवणऱ्या अडीअडचणी तसेच सोईसुविधा बाबत माहिती घऊन उपस्थित अधिकारी, कर्मचारी मुलींना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेविषयी वसतीगृहातील गृहपाल व कर्मचारी यांचेशी चर्चा करुन मुलींच्या सुरक्षेतेविषयी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच वसतीगृह इमारत व परीसरात अद्यावत अत्याधुनीक सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे व वसतीगृहात काणत्याही अनचीत घटना घडणार नाही यांची दक्षता घेण्यात याव्यात असे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत १० मुलामुलींचे शासकीय वसतीगृह व २ निवासी शाळा कार्यरत आहे. या वसतीगृह व निवसी शाळेत अनु.जाती, नवबौद्ध घटक, अनु जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास तसच अनाथ , अपग अशाप्रकारच्या वंचीत घटकातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे यावेळी प्रसाद कुळकर्णी यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी वसतीगृहाचे प्रशासन सुव्यवस्थीत असल्याने प्रसाद कुळकर्णी सहाय्यक व वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती पाटील यांचे अभिनंदन केले.