बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक; २४ ऑगस्टला दिली “महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई/प्रतिनिधी बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमळ महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही.

शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला.

या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक १० तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना तिथून हुसकावून लावलं. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता महाविकासआघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणादिली आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीनसारराज्यातील मुलीसुद्धा सुरक्षितनाहीत.

या घटनेला दाबण्यासाठीसरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसचीअसल्यामुळे त्यांची बदनामी होऊनये म्हणून काळजी घेतली गेली.महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले.आम्हाला यात राजकारणकरायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्नकेला जातोय. त्यामुळे येत्या२४ तारखेला महाराष्ट्र बंदचीहाक आम्ही दिलेली आहे.त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारलाआरसा दाखवण्याचे काम जनता करेल, असं नाना पटोले म्हणाले.