देशात एकच आवाज अब की बार ४०० पार; पीएम मोदींनी दिला नारा

यवतमाळ/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलतानामोदींनी जय भवानी, जय शिवाजी, जयसेवालाल, जय बिरसा असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

१० वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायलाआलो तेव्हा तुम्ही छऊ- ला ३०० पार केले.. २०१९ मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही छऊ- ला ३५० पार पोहोचवले. आणि आता२०२४ मध्ये जेव्हा विकास पर्वालाआलो आहे. तेव्हा देशात एकच आवाजआहे, अब की बार ४०० पार. संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा छऊ- ४०० पार. आम्ही शिवाजी महाराजांना मानणारेलोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमीदेशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे. गरीब, युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती?. तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटी पैकी १८ हजार कोटी खाऊन टाकले असते.

किसान सन्मान निधीचं वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी “इंडी’ आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते एकदा आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं. गावागावामध्य गरीब शतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हतं. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबलं आणि बघता बघता पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.

हीच मोदींची गॅरंटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचं सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहेचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. लोकांना १ रुपयातले केवळ १५ पैसे मिळायचे. आज काग्रेसच सरकार असतं तर जे २१ हजार कोटी रुपय आज शतकऱ्याना मिळाल आहत,त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटलेगल असत आणि कवळ तीन हजार काटलोकांना मिळाले असते. परंतु, आता भाजपा सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्यालात्याचा पूर्ण हक्क मिळेल. पै-पै त्याच्या खात्यात पोहोचेल. नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे डबल इंजिनाची डबल गॅरंटीआहे.आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ३,८०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.पीएम किसान सन्मान निधीचे दर वर्षी १२ हजार रुपये मिळत आहेत. किसानसन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे छोट्या शेतकऱ्यांच्या कामीयेत आहेत. पीएम मोदी यांनी आज शेतकऱ्यांनाप्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत २१,००० कोटींहून अधिकरुपयांचा १६ वा हप्ता जारी केला.या योजनेअंतर्गत आतापर्यंत ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. सुमारे ३,८०० कोटी रुपयांच्या ‘नमो शेतकरी महासम्मान निधी’चा दुसरा आणि तिसरा हप्ताही पंतप्रधानांनी वितरित केला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.