जिल्ह्यात सहा नगरपरिषदेची निवडणुकांची रणधुमाळी रंगणार

 पलाश उमाटे/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम वर्धा : गेल्या चार वषापासन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा सुरू असताना न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणक प्रकिया घण्यास सरुवात झाली. निवडणूक विभागाने निवडणुकीचा कायकम घोषित न केल्यामुळे निवडणूक कधी होणार हा प्रश्न कायम होता. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर राजी निवडणुकीचा कायकम घाषित केला आहे. अखेर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असे म्हणत इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे.

नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून घेण्यात आल्या नाही. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर शासन नियुक्त प्रशासन होते. सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी सरू असताना अनेकदा इच्छुकांचा हिरमोड झाला. या संदर्भात न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाने निवडणूक घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला त्यानुसार निवडणूक विभाग कामाला लागला. ४ निवडणूक नोव्हेंबर रोजी विभागाने रीतसर निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्या कायकमानसार नामनिदशनपत्र दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत २१ नोव्हेंबर राहणार आहे. अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अतिम मदत २५ नाव्हबर असणार आहे. प्रत्यक्ष मतदान ०२ डिसेंबर रोजी घेण्यात येईल व मतमोजणी ०३ डिसेंबर रोजी शासनाने निश्चित केलेल्या जागेवर केली जाणार आहे. हा कार्यक्रम आज घोषित झाल्यानंतर अखेर निवडणूक जाहीर झाली असे म्हणत इच्छुक उमेदवार कामाला लागले. जिल्ह्यात सहा नगरपरिषदेची सावत्रिक निवडणकहोणार आहे. त्याकरिता २लाख ८६ हजार ५४६ मतदारजिल्ह्यात १६६ नगरसेवकांसह सहानगराध्यक्ष मतदारांना निवडायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *