दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ, सावंगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी, विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आलीत. या उपक्रमात विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, उपअधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.