“जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- पालकमंत्री
वर्धा/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सर्कस मैदान रामनगर येथून सकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या या पदयात्रेत वधा शहरवासीयांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडाळ व विविध विभागाच अधिकारी उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व तरुण व नागरिकांनी १९ फेब्रुवारी २०२५ राजी सकाळी ७:३० वाजता मोठ्या संखेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर पदयात्रेचा उद्घाटन समारंभ ७:३० वाजता सुरू होईल, त्यानंतर पदयात्रा आणि समारोप समारंभ होईल, सदर कार्यक्रमावेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी देशाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करतील. या कार्यक्रमाची प्रशासनाने तयारी केली असून शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना, लखपती दीदी व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे ते म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन करण्याचा हा सोहळा असून ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.