हिंदी भाषेत जगाला जोडण्याची ताकद आहे- के.श्रीनिवास राव हिंदी भाषेत जगाला जोडण्याची ताकद आहे- के.श्रीनिवास राव

वर्धा/प्रतिनिधी हिंदी ही केवळ एक भाषा नसून एक तत्वज्ञान आहे. भारतातील सर्व भाषांची एकता हिंदीचे रूप निर्माण करताना दिसून येते. भारतात हिंदीबद्दल वेगवेगळी मते असू शकतात, पण जगात हिंदी भाषेला भारताशी जोडून बघितले जात आहे. हिंदी भाषा आणि साहित्याला स्वत:च्या बळावर आदर मिळेल, असे प्रतिपादन के. श्रीनिवास यांनी केले. हिंदी साहित्य संमेलन प्रयागचे ७४ वे वार्षिक अधिवेशन आणि राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांचे ३० वे अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा सेवाग्राम येथील शांती भवन येथे पार पडला. हे संमेलन राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा आणि हिंदी साहित्य संमेलन प्रयाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आहे. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी, एकता आणते आणि सर्वांना एका धाग्यात बांधते, भाषा ही विचार आणि विचारांची जननी आणि अभिव्यक्तीचे माध्यम आहे. यावेळी विभूती मिर्शा, डॉ. अखिलेश मिर्शा, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सूर्यप्रसाद दीक्षित यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन हिंदी साहित्य संमेलनाचे सहाय्यक मंत्री श्यामकृष्ण पांडे यांनी केले. आभार ओ.पी. गुप्ता यांनी मानले. यावेळी हिंदी साहित्य संमेलन प्रयागच्या स्थायी समितीचे सदस्य डॉ. प्रभात ओझा आणि साहित्य अकादमी, नवी दिल्लीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. सत्रात स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला.
अधिवेशनात विविध प्रांतातील ३०० हून अधिक लोक उपस्थित होते. नवी दिल्लीचे सचिव डॉ. श्रीनिवास राव होते. हिंदी साहित्य संमेलनाच्या ७४ व्या सत्राचे उद्घाटन आभासी पद्धतीने आयलर्ंडचे भारताचे राजदूत डॉ. अखिलेश मिर्शा यांनी केले. दीपप्रज्वलनाने हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रयागचे विभूती मिर्शा, हेमचंद्र वैद्य, डॉ.के. श्रीनिवास राव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे अध्यक्ष हेमचंद्र वैद्य यांनी समारंभाला संबोधित करताना सांगितले की, भाषा ही