भाजपला मोठा धक्का! २०२४ मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचं वेध प्रत्येक पक्षाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही कंबर कसली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी जनेतच्या मनात राजकीय पक्षाविषयीचं मत बदलत असल्याचं दिसतेय. नुकत्याच झालेल्या एका सर्वे नुसार, भाजपलाला नुकसान होण्याची शक्यता आहे तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा काळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी जानेवारीमध्ये ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत राजकीय सर्वे घेतला होता. सध्याच्या घडीला निवडणूक झाली काय निकाल लागू शकतो, यावर सर्वे घेण्यात आला होता. यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९८ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला १५३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ९२ जागांवर समाधान मानावे लागेल, असं सर्वे तून समोर आलेय. सहा महिन्यापूर्वी (ऑगस्ट २०२२) सी वोटरनं घेतलेल्या सर्वेत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला ३०७ जागा मिळतील असा अंदाज होता. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला १२५ जागांची शक्यता होती. त्याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष असे १११ जागांचा अंदाज होता. पण जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेत भाजपच्या जागांमध्ये ९ जागांची घरसरण झाल्याचं दिसून आले. तर यूपीएच्या जागांमध्ये २८ ने वाढ जाल्याचं समोर आलेय. त्यावरुन काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसतेय तर भाजपला फटका बसल्याचं दिसेतय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलेय. सी वोटरच्या ऑगस्ट २०२२ मधील सर्वेनुसार यूपीएची मताची टक्केवारी २८ टक्के होती, ती जानेवारी २०२३ मध्ये २९ टक्के झाली आहे. काँग्रेसच्या मतामध्ये एक टक्के वाढ झाल्याचे दिसतेय. तर भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता होती तर जानेवारी २०२३ मध्ये त्यांना ४३ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपच्या मतांमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचं सर्वेतून समोर आलेय.