मालाडमध्ये झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील मालाड भागात झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यासोबत, सुमारे ५० हून अधिक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचेही चित्र आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सध्या तरी आग आटोक्यात आली असली तर झोपडपट्टीधारकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मालाड परिसरामधील दिंडोशी येथील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) मध्ये सकाळी हा प्रकार घडला. सुरूवातीला छोट्या वाटणाऱ्या आगीने नंतर बघता बघता रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आजूबाजुच्या झोपड्यांनीही पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. पश्चिम उपनगरांतील मालाड पुर्वकडील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही आग लागली.