गांधीजींच्या ग्राम विकास संकल्पनेतूनच नवभारताचा उदय- प्रा. राजेश बाळसराफ

वर्धा/प्रतिनिधी “महात्मा गांधींच्या ग्राम विकास योजना’ या विषयावर इंटिग्रेटेड सोसायटी ऑफ मीडिया प्रोफेशनल्स, (आईएसएमपी) महाराष्ट्र यांच्या वतीने खैरवाडा येथे आयोजित चर्चेत प्रा. राजेश बाळसराफ म्हणाले की महात्मा गांधी यांच्या ग्राम विकासाच्या योजनांमध्ये ग्राव स्वयंपूर्ण करण्याची संकल्पना असून नवभारताच्या उदयासाठी त्यांच्या ‘खेड्याकडे चला’ या विचारावर चालण्याची गरज आहे. खैरवाडा ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी आयोजित चर्चे च्या अध्यक्षस्थानी आयएसएमपी, लखनौचे चेयरमन चंद्रशेखर होते. यावेळी सरपंच दिलीप साठे, महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समितीचे अध्यक्ष साहेबराव कोल्हे, आयएसएमपी महाराष्ट्रचे अध्यक्ष कौशल मिश्र, सातारा येथील पर्यावरण तज्ज्ञ व स्वातंत्र्य सैनिक संघटन, महाराष्ट्रचे अध्यक्ष विजय देशपांडे मंचावर उपस्थित होते. प्रा. बाळसराफ म्हणाले की ‘खेड्याकडे चला’ हे खेडी सशक्तिकरणासाठी १९१६ मध्ये सुरू झालेले एक अभिनव आंदोलन होते. आर्थिक समस्यांवर निदान करण्याचा मार्ग या विचाराच्या केंद्रस्थानी होता. ते म्हणाले की पंचवार्षिक योजने अंतर्गत ग्राम विकासाच्या योजनाएं सुरू झाल्या परंतु आजही दूर्गम भागात विकासाचा अभाव दिसून येतो. गांधीजींच्या प्रेरणेतूनच वनवासी श्रेत्रात ठक्कर बाप्पा, भूदान चळवळीत विनोबा भावे आणि महारोगी सेवेत बाबा आमटे यांचे कार्य सुरू झाले. सर्वोदय व अंत्योदय हाच विचार यातून दिसतो. ग्रामीण अर्थकारणाचे प्रतीक चरखा असून त्या सोबतच शेतीशी संबंधित उद्योग व व्यवसायाची साखळी तयार करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. चर्चेत विजय देशपांडे व सरपंच दिलीप साठे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन निलीमा मुनोत यांनी केले तर एड. निलकंठ हूड यांनी आभार मानले. यानंतर ‘पर्यावरण वाचवा-मनुष्याचे अस्तित्व वाचावा’ यावर समुह चर्चा घेण्यात आली. यानंतर सर्व सहभागींना श्री चंद्रशेखर व कौशल मिश्र यांनी प्रमाण पत्र प्रदान केले. या प्रसंगी डॉ. जयप्रकाश नागला, आदेश माळवदे, नरेंद्र दीक्षित, हर्षल गिरी, कोल्हापूरचे डॉ.एन. एन. काजी, वर्धेचे बी. एस. मिरगे, प्रा. निलीमा निखार, वृषाली बकाल, एड. ताम्रध्वज बोरकर, अमिता शिंदे, प्रिया कुमारी, जमीर शेख, कालेश्वर झामरे, अश्विन व प्रांजल श्रीवास यांच्या सह ग्रामवासी उपस्थित होते.