पुस्तक प्रकाशन मंचावर १०५ लेखकांची ११२ पुस्तके प्रकाशित

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधी साहित्य नगरी वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग. त्र्यं. माडखोलकर पुस्तक प्रकाशन मंचावर सतत तीन दिवस आठ सत्रातून अनोखा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यात महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्रातून आलेल्या १०५ लेखकांच्या ११२ पुस्तकांचे प्रकाशन नामवंत लेखकांच्या हस्ते संपन्न झाले . नवोदित व प्रतिष्ठित लेखकांचाही समावेश होता. ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाचे उद्घाटन पूर्वाध्यक्ष भारत ससाणे यांच्या हस्ते व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेत पहिल्या दिवशी झाले . यावेळी डॉ रवींद्र रवींद्र शोभणे. मंचाचे संयोजक डॉ राजेंद्र म प्रमुख उपस्थिती होती . संमेलनात १०५ लेखकांच्या ११२ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, अशी माहिती ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाचे समन्वयक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. यामध्य े जालन्याच्या ुंढे यांची हिरकणी साहित्य मंचच्या ४३ कवयित्री, लेखिकांची ६६ पुस्तके प्रकाशित करण्यात आली. वेध रायगडाचा हेही एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक या कट्ट्यावर प्रकाशित करण्यात आले. यात नवोदित व प्रतिष्ठित लेखकांचाही समावेश होता. वैदर्भीय २० व वर्धा जिल्ह्यातील १४ कवी – कवयित्री – लेखक यांचा समावेश होता . तीन दिवसातील आठ सत्रात दुसर्या दिवशी झालेल्या प्रकाशन सत्रात जालन्याच्या हिरकणी महिला साहित्य मंचाच्या ४३ कवयित्रींच्या तब्बल ६६ पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. या पुस्तकांत कथा, कादंबरी, कविता अशा पुस्तकांचा समावेश आहे. वेध रायगडाचा हेही एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक या कट्ट्यावर प्रकाशित करण्यात आले. या पुस्तक, प्रकाशनामध्ये लेखिका, कवयित्री, कवी यांनी अभिवाचन, मनोगत व्यक्त केले. तसेच पुस्तकावर पाहुण्यांनी थोडक्यात अभिप्रय देखील नोंदविला. तीन दिवसातील आठ सत्रात झालेल्या प्रकाशन सत्रात कार्याध्यक्ष प्रदीप दाते, सुप्रसिध्द समीक्षक डॉ. सुधीर रसाळ. कादंबरीकार अशोक व्हटकर, कथाकार सतीश तराळ. साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, स्तंभकार अशोक बेंडखळे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. वासुदेव डहाके,डॉ. देवेंद्र पुणसे, डॉ. रवींद्र शोभने,कवी प्रवीण देशमुख डॉ. राजेंद्र मुंढे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. उल्हास लोहकरे, सचिन सावरकर , संघर्ष डहाके, प्रा. सुरेखा दंढारे व प्रा. वैशाली धंदोरिया यांनी केले.