अ. भा. साहित्य संमेलनात फाळणीच्या वेदना ठरणार आकर्षण!

वर्धा/प्रतिनिधी अ. भा. साहित्य संमेलनाच्या इतिहासात ग्रंथप्रदर्शनी आणि विक्रीचे सर्वात मोठे दालन वर्धेतील साहित्य संमेलनात लागले आहेत. येथे २९९ दालनांची व्यवस्था करण्यात आली असुन आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाची परंपरा मोडीत काढून संमेलनापूर्वी २ रोजी या ग्रंथदालन आणि प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या दालनातील संस्कृती जागरण मंडळ व सांस्कृतिक वार्तापत्र या दालनातील फाळणी नंतरच्या वेदना, संविधान रक्षा, भारताची सुरक्षा हे दोन्ही पुस्तकं लक्ष्यवेधक ठरत आहेत.

पुण्यातून २२ वर्षांपासून हिंदू आणि राष्ट्रजागृतीसाठी संस्कृती मंडळाच्या वतीने काढण्यात येणारे पाक्षिक महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यात प्रसारिक केले जातात. मंडळाच्या वतीने युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार, द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस, हिंदू संघटक सावरकर, राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यलढ्यातील जनजातीचे योगदान, फाळणीच्या वेदना, संविधान रक्षा : भारताची सुरक्षा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महिमा श्रीरामांचा, असं साकारतंय राममंदिर, पणतीला जपताना या मराठी पुस्तकांसह ज्योतिपुंज : नरेंद्र मोदी, भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता, हमारे श्री गुरुजी, जानिए संघ को, १००० संघ प्रश्नोत्तरी, वीर सावरकर, अजित डोभाल, लोकमान्य बाल गंगाधर तिलक, वंदे मातरम्, आचार्य विनोबा भावे, डॉ. आंबेडकर आर्थिक विचार एवं दर्शन, डॉ. आंबेडकर सामाजिक विचार एवं दर्शन आदी पुस्तकं अ. भा. साहित्य संघात विक्री करिता उपलब्ध आहेत. याशिवाय याच दालनात आम्ही कोणाचे वंशज या शिर्षकांतर्गत १० पेक्षा अधिक पोस्टरर्सची प्रदर्शनीही लावण्यात आली आहे. या प्रदर्शनला भेट देण्याचे आवाहन, सांस्कृतिक वार्तापत्रच्या वतीने करण्यात आले आहे.