केवळ २७.१० टक्के व्यक्तींर्कडे “प्रधानमंत्री जनआरोग्य’ कार्ड

वर्धा/प्रतिनिधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. इतकेच नव्हे तर त्याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातही केली जात आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ व्यक्तींर्ची नोंदणी करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींर्ना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींर्ना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.