वर्धा शहरातील हॉटेल व्यवसायकांचा हैदोस
वर्धा/प्रतिनिधी स्थानिक वधा शहरातील बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शहरातील ठिकठिकाणी खानपानाच्या छोटे दुकान,हातगाड्या यांचे प्रमाण वाढत चालले आहेत. वर्धा शहरातील मुख्य बाजारमध्ये असलेल्या रोड वर हॉटेल धारकांची प्रामुख्याने गर्दी वाढल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. अश्या लहान-सहन हॉटेल व्यवसायकांनी आता चक्क छोटे घरगुती सिलेंडर उघड्यावर वापरण्यास सुरवात केली आह. अत्यावश्यक वस्त अधिनियमानुसार घरेलू सिलेंडरचा चा वापर हॉटेल व्यवसायिकाने करणे हा गुन्हा आहे.परंतु कोणत्या सिलेंडर पुरवठादारा द्वारे मार्फत या हॉटेल व्यवसायिकांना छोट्या सिलेंडर च्या पुरवठा होते? हा सुद्धा एक गंभीर विषय आहे.
सध्या स्थिती वर्धा शहरातील काही हॉटेल व्यावसायिक पान टपरी च्या नावावर कोणतेही परवाना न बाळगता छोटे सिलेंडर वापरून चक्क सरकारी जागेत टेबलं लावून उघड्यावर अन्न पदार्थ विकू लागले आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारवाईला डावलून अपमान करू लागले आहेत.अश्या मुजोर हाटल व्यवसायिकाच्या आणि सिलेंडर पुरवठादाराच्या मुसक्या आवळणे आता वर्धा जिल्हातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्या करिता एक मोठे आवाहन झाले आहे.