वाहनांमुळे पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी या स्वरतरंग कार्यक्रमासाठी प्रायोजक केल्याबाबत न्युरॉन हास्पीटल नागपूर, इवोनिथ स्टील, सीडेक एक्सप्लाजीव्ह तळगाव, दत्ता मेघ अभिमत विद्यापिठ, अग्नीहोत्री ग्रुप, महालक्मीधि संगम स्टील यांचे आभार मानले.
पोलीस विभागातील कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कुटूंबाना वेळप्रसंगी आर्थिक मदतीची आवश्यकता पडते अशा वेळी पोलीस कल्याणनिधीमधून मदत करण्यात येतेया निधी मध्ये वाढ करण्यासाठी अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. याकार्यक्रमामुळे वर्धा पोलीसकल्याण निधीत वाढ होण्यासमदत होणार असल्याचे दिलीप भुजबळ म्हणाले. स्वरतरंग कार्यक्रमात मराठी हास्य कलाकार भारत गणेशपुरे, सागर कारंडे, मेघना येरंडे, माया शिंदे, हेमांगी कवी, गौरव मोरे, जयवत भालराव आदी कलाकरानकला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली तसेच कैलाश खेर यांनी गायिलेल्या गान्यांना प्रक्षेकांनीदाद दिली. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्तेकैलाश खेर व हास्य मराठी धमालकार्यक्रमातील कलाकारांचे स्वागतकरण्यात आले. कार्यक्रमालाहजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थितहोते.